नांदगाव तालुक्यात उबाठा आणि राष्ट्रवादीला खिंडार अनेक कार्यकर्त शिवसेनेत

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव मतदार संघातील जातेगांव जिल्हा परिषद गटातील ढेकू येथील उबाठा गटाच्या कळवाडी गटात राष्ट्रवादीला खिंडार पडले असून अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुहास कांदे यांच्या विकासात्मक नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

कळवाडी आणि जातेगाव जिल्हा परिषद गट हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील दोन बाजूचे टोकं असल्याने विशेषतः जातेगाव जिल्हा परिषद गट हा जिल्ह्याचे शेवटचे टोक असल्याने विकास कामांपासून दुर्लक्षित राहिला होता. मात्र आ कांदे यांनी सर्व तालुक्यात मागील पाच वर्षात गावागावात विकास कामांवर भर दिल्याने तालुक्यातील नागरिक आपोआप आ.कांदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे युवासेना नेते गुलाब चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणूकच्या तोंडावर होत असलेल्या पक्ष प्रवेशास विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.याप्रसंगी निलेश चव्हाण, रवींद्र चव्हाण, अंकुश चव्हाण, गुलाब चव्हाण, बाळू सोनावणे, विजय सूर्यवंशी, सुरेश सूर्यवंशी, देवीदास राठोड, लालचंद चव्हाण, सुनील सूर्यवंशी, योगेश गायके, मधुकर पवार, पृथ्वीराज चव्हाण, नितीन चव्हाण, आबा चव्हाण, देविदास चव्हाण, प्रवीण सूर्यवंशी, विजय चव्हाण, विजय राठोड, करण चव्हाण,दत्तू गोरे, रविराज पवार, सुनील वाघ, जितू सोनावणे, विकास वाघ, अजय मोरे, रोहिदास वाघ, अरुण वाघ, बादल सोनावणे, अजय सोनावणे, अभिजित माळी, सचिन माळी, कोहिनुर माळी, अजय सोनावणे, सोनू वाघ, विनोद वाघ, संजय वाघ, राकेश सोनावणे, जाकेश पवार,सोनू मोरे, दिनेश मोरे, पवन दळवी, विशाल वाघ, सागर वाघ, भरत वाघ या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. 

त्यांचे भगवा देऊन आमदार सुहास कांदे यांनी स्वागत केले. यावेळी हेमराज चव्हाण, विश्वास राठोड, एन. के. राठोड, राजेंद्र चव्हाण, आनंद सूर्यवंशी, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर कांदे व शाखा प्रमुख सोनू पाटील, रावसाहेब पाटील, उदयसिंग पवार, दादाभाऊ मांडवडे, ईश्वर बाबा, समाधान मांडवडे, आदी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments