नांदगांव बाजार समिती मध्ये मका शेतमालाची आवक गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस वाढत असून आज रोजी बाजार समितीचे यार्डवर बुधवार रोजी ७५०० क्विंटल आवक झाली असून २ हजार ७४९ सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
नांदगांव तालुक्यासह चाळीसगांव , वैजापूर , कन्नड या तालुक्यातून नांदगांव बाजार समितीचे नांदगांव , बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवर मोठ्या प्रमाणात मका आवक येत आहे. परंतू परतीच्या पावसाने सध्या नांदगांव तालुक्यात थैमान घातल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याच परिस्थीती मध्ये दिवाळी सण तोंडावर आल्याने शेतकरी वर्ग बाजार समिती मध्ये मका शेतमाल विक्री करणेसाठी आणत असून बाजार समितीच्या कार्यालय परिसरातच शेतमाल विक्रीचे पेमेंट रोख स्वरूपात अदा केले जात असल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.
पावसाचे वातावरणामुळे गेल्या दोन दिवसापासून बोलठाण व न्यायडोंगरी यार्डवरील लिलावाचे कामकाज व्यापारी वर्गाच्या विनंतीवरून बंद होते . तसेच नांदगांव यार्डवर मोठ्या प्रमाणात आवक येत असून वाळलेला मका या शेतमालास कमीतकमी २००० ते २७४९ असा बाजारभाव मिळाला असून सरासरी बाजारभाव २३५० रूपये मिळाला आहे. तसेच पावसाचे वातावरण असल्याने काही प्रमाणात ओली मका विक्रीस येत आहे. त्यामुळे ओल्या मकाला बाजारभाव १४०० ते १७०० असा बाजारभाव मिळाला आहे.
शेतकरी बांधवांना शेतमाल विक्री नंतर रोख स्वरूपात पेमेंट कार्यालय परिसरातच केले जात असून यासाठी नांदगांव व बोलठाण यार्डवर करण्यात आल्या नव्याने व्यापारी वर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था असून शेतकरी वर्गाने नांदगांव, बोलठाण व न्यायडोंगरी या नांदगांव बाजार समितीच्या यार्डवर मका विक्रीस आणावा असे आवाहन नांदगांव बाजार समितीचे सभापती सतिष बोरसे यांनी केले आहे.
0 Comments