बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैन येथील महादेव मंदिरात पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी झाल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत मोठ्या प्रमाणात भाविक जखमी झाल्याने जातेगाव येथील श्रीक्षेत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर येथे देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन सुलभ व्हावे. यासाठी नवीन दर्शन बारीचे काम हाती घेतलेले असून मंदिरास नवीन संरक्षण भिंत उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. असे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अर्जुन (बंडू) पाटील, सचिव बाबासाहेब चव्हाण, खजिनदार रामदास पाटील विश्वस्त शिवाजी वर्पे यांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटलं आहे.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष बंडू पाटील म्हणाले की दोन हजार फूट लांबीच्या दर्शन बारी करण्यात आलेल्या असून यामध्ये एका वेळेस सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सुमारे दोन हजार भाविक देवाचे दर्शनासाठी उभे राहू शकतात त्याचप्रमाणे यापेक्षा व्यतिरिक्त झालेल्या भाविकांच्या गर्दीसाठी मंदिर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत भाविकांची पोलीस प्रशासन खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने दर्शन रांग करण्यात येते. त्यामुळे येथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची योग्य ती दखल देखील घेतल्या जाते. तसेच लाऊड स्पीकर च्या माध्यमातून भाविकांना वेळोवेळी योग्य त्या सूचना करण्यात येतात असे म्हटले.
* पोलिसांकडून विश्वस्त मंडळास सुचना व भावनिकांना आव्हान*
श्रावण महिना सुरू होण्याअगोदर नांदगाव पोलिस ठाण्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक यशवंत सोळशे, उपनिरीक्षक सतीश गावित आणि पोलिस हवालदार भास्कर बस्ते यांनी भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. यासाठी प्रत्यक्ष मंदिर परिसर आणि दर्शनबारीची पाहणी करून मंदिरात नवीन उभारलेल्या संरक्षण भिंतीस एक इमर्जन्सी गेट विश्वस्त मंडळात ठेवण्याची सूचना केली. त्यामुळे मंदिराच्या आतील भागात एखाद्या भाविकाची आरोग्याची समस्या उद्भवल्यास किंवा इतर काही महत्त्वाच्या कामासाठी या दरवाज्याचा उपयोग होईल असे यावेळी पोलीस निरीक्षक सोळसे यांनी सांगितले.
त्याबाबत मंदिराच्या समोर असलेल्या जुना मुख्य दरवाजा चा हा गर्दीच्या वेळेत पोलिस प्रशासन, सुरक्षा रक्षक आणि आरोग्य विभाग फक्त यांच्यासाठी असणार असल्याचे सचिव बाबासाहेब चव्हाण यांनी खुलासा केला.
पिनाकेश्वर देवस्थान हे समुद्रसपाटीपासून सुमारे पंधराशे फूट डोंगराच्या शिखरावर उंचीवर असून येथे येणाऱ्या भाविकांना जाण्या येण्यासाठी एकच मार्ग असून सुमारे तीन किलोमीटरचा पंधरा फूट रुंदीचा घाट रस्ता आहे. खबरदारी उपाय म्हणून भाविकांनी डोंगराच्या पायथ्याशी आपले दुचाकी चार चाकी इत्यादी सर्व वाहने उभी करून डोंगरावर चालत जाऊन देवाचे दर्शन घ्यावे जेणेकरून कुठल्याही प्रकारची दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments