पहिल्याच सोमवारी पिनाकेश्वराचे घेतले ३० हजार भाविकांनी दर्शन घेत वन पर्यटनाचा आनंद घेतला

Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव पासून उत्तरेस सात किलोमीटर अंतरावरील डोंगराच्या शिखरावर जळगाव आणि छत्रपती संभाजी महाराज नगर व  नाशिक जिल्ह्याच्या वनविभागाच्या जोडावर नाशिक जिल्ह्यातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नंतरचे दुसर्या क्रमांकाचे मोठे (शिवालय) महादेवाचे देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवार चे औचित्य साधून रविवारी रात्री बारा वाजेपासून सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत तीस हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेत वन पर्यटनाचा आनंद घेतला.

सविस्तर वृत्त असे की, हिंदू धर्मामध्ये देवदर्शन व धार्मिक विधी साठी पवित्र मानण्यात आलेल्या श्रावण महिना सुरू झाल्यापासून दररोज मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ लागलेली पहावयास मिळत असून पहिल्याच सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेशातील तीस हजार पेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येवून गेले असल्याचे सांगितले जाते. 

 या देवस्थानाला खानदेश मध्ये मोठा महादेव आणि मराठवाड्यात नवसाला पावणारा महादेव नावाने ओळखल्या जाते, येथे येणारे भाविक या देवास दाळ बट्टीचा नैवद्य दाखवून अन्नदान करतात  तसेच सत्यनारायण आणि विविध प्रकारचे धार्मिक विधी करतात. या देवस्थानाकडे जाण्यासाठी गावापासून काही अंतरावर वसंत नगर चंदणपूरी मार्गे आणि बोरसे वस्ती मार्गे असे दोन रस्ते असून रहदारी ठप्प होवू नये म्हणून देवस्थानाकडे जाण्यासाठी एक व येण्यासाठी एक रस्त्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यासाठी या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारी दुपारच्या नंतर निघून गेल्यामुळे रहदारीचे नियोजन कोलमडल्याने डोंगर पायथ्यापासून बोरसे वस्ती मार्गे येणार्या रस्त्यावर सुमारे दोन किलोमीटर रहदारी ठप्प झाली होती.

सालाबादप्रमाणे यंदाही भाविकांचे देवाचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.पोलिस निरीक्षक यशवंत सोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नी. सतिश गावीत पोलिस हवालदार भास्कर बस्ते, पोलिस शिपाई परमेश्वर श्रीखंडे तसेच मनमाड येथील दंगा नियंत्रण पथक, महिला व पुरुष पोलिस शिपाई, होमगार्ड पथकाने मंदिर परिसरात व ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.






Post a Comment

0 Comments