चांदेश्वरी घाटातील अपघात टाळण्यासाठी करावी लागणार उपाययोजना अनेकांना गमवावे लागले जीव तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व

 Bay- team aavaj marathi 

अरुण हिंगमिरे दि १७..... चांदेश्वरी घाटातील अपघात टाळण्यासाठी करावी लागणार उपाययोजना करणे गरजेचे आहे. या घाटात गेल्या दहा वर्षांत दुचाकी सह लहान मोठ्या वाहनांचे शंभर पेक्षा जास्त अपघात शेकडो प्रवाश्यांना आपला जीव गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. तर लाखो रुपयांच्या जिवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील पुर्व भागातील मराठवाड्यातील छत्रपती संभाजी म.नगर कडून येणारी दक्षिण भारतातील वाहनांची वर्दळ सध्या मोठ्या प्रमाणात शिऊर बंगला मनेगांव फाटा बोलठाण जातेगांव मार्गाने चांदेश्वरी घाटातुन सुरू आहे. चांदेश्वरी घाटातील अपघात टाळण्यासाठी करावी लागणार उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या घाटात मोठ्या प्रमाणात उतरताना पहिला व चढताना शेवटच्या म्हसोबा देवस्थान जवळ मोठ्या प्रमाणात उतार व दोन ठिकाणी अवघड वळण असून अरुंद रस्ता आहे. कन्नड तालुक्यातील औट्राम घाट कोर्टाच्या आदेशानुसार वाहतूकीसाठी बंद केल्यानंतर देशातील दक्षिण उत्तर भागातील मालवाहू वाहने, तापी नदीच्या पात्रातून ७० टनांपर्यंत वाळू ची वाहतूक करणारी वाहने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बस आणि बोलठाण उप बाजार समिती मध्ये शेतमाल विक्री करणार्यास येणाऱ्या वाहनांची लहान मोठ्या संख्या दररोज साधारण आठशे ते हजार गेल्या काही दिवसांपासून झाली आहे.

त्यामुळे दोन्हीकडून येणाऱ्या वाहनांमुळे घाटात वाहतूक कोंडी झाल्यानंतर अवजड वाहनांचे चाकं स्लिप होत असल्याने घाटात तसेच मन्ह्यड पाण्यापर्यंत चाळीस किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यावर तात्पुरती मलमपट्टी करून डागडुजी करणे ही उपाययोजना करणे नसून खराब झालेला सर्वच रस्ता नविन करणे आवश्यक आहे.

 यावर बोलताना नांदगाव बांधकाम उपविभागाचे तत्कालीन अभियंता डी.ए.धारक आणि देशमुख यांनी घाटामध्ये अरुंद रस्ता व तीव्र उतार आणि दोन ठिकाणी अवघड वळण आहे. हा रस्ता ठराविक ठिकाणी रुंद करुन तीव्र उतार कमी करुन अवघड वळणाच्या ठिकाणी रुंदीकरण आणि साधारण पाचशे मिटर सिमेंट रस्ता करणे करण्यासाठी तसेच तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे परंतु निधी उपलब्ध नसल्याने तुर्तास शक्य होणार नाही. त्यासाठी अवजड वाहतूक चांदेश्वरी मार्गे होणारी बंद केल्यास होणारे अपघात टळतील, त्यासाठी पोलिस विभागास पत्र पाठविले असल्याचे त्यांनी म्हटले.


तर वाहनचालक सुरेश गायकवाड म्हणाले की, प्रत्येक वाहनधारक सरकार ला रोड टॅक्स देतात त्यामुळे कोणत्या रस्त्यावर चालवायची हे सक्ती करुन सांगू शकत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे व्यवस्थित करावे, व जिवीत हानी टाळण्यासाठी घाटात मजबूत संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे असे मत व्यक्त केले.


 

Post a Comment

0 Comments