उमरखेड येथील डॉ.इक्बाल नगर परिषद उर्दू मुलींच्या माध्यमिक शाळेत 'अल्पसंख्याक हक्क दिन' अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेतृत्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापिका श्रीमती राहत रोशन अंसारी यांनी केले.
या सोहळ्यात अल्पसंख्याकांचे हक्क, घटनात्मक संरक्षण आणि सामाजिक समता यावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी शेख उस्मान शेख अहमद यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, भारतीय संविधान अल्पसंख्यांकांना धार्मिक स्वातंत्र्य, शिक्षण, भाषा आणि संस्कृतीचे जतन यांसारखे मूलभूत अधिकार प्रदान करते, ज्याची जाणीव प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या हक्का सोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवण्याचे आणि समाजात बंधुभाव जोपासण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये विद्यार्थिनींनी अल्पसंख्याकांचे हक्क, राष्ट्रीय एकात्मता आणि घटनात्मक मूल्ये यावर आपले विचार व्यक्त केले.
शेवटी, जुबेर अहमद खान नजीर मोहम्मद खान यांनी सर्व पाहुणे, शिक्षक आणि विद्यार्थिनींचे आभार मानले. असे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि नैतिक जडणघडण महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी श्री. अजय कुरवाडे मुख्याधिकारी, नगर परिषद, श्री. नितीन चव्हाण उप मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी, श्री. विजय बेतेवाड गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, चंदा ढोणे विस्तार अधिकारी पंचायत समिती आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या SMC अध्यक्ष यास्मिन बानो मोहम्मद खुसश्तर, मुमताज खान रियासत खान, गौस खान रहीम खान, सीमा बी शेख इस्माईल, आमेना सरवत मुजाहिदोद्दीन, सुमय्या मुजाहिद इक्बाल, फिरोज अहमद मोहम्मद युसूफ, अमजद खान हुसेन खान, नसरीन बी रियाज मोहम्मद खान, रुखसार बेगम मोहम्मद कलीम, शेख इमरान शेख रहीम, जीनत परवीन सय्यद जमीर आणि शेख उस्मान शेख अहमद यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवाब खान अमानुल्ला खान, जुबेर अहमद खान नजीर मोहम्मद खान, शमीम बानो समीर अहमद, शाइस्ता बेगम सय्यद कय्यूम, इक्रामउल्ला खान करामतुल्ला खान, नफिसा बेगम शेख अकील, सायमा बतुल मन्सूरुद्दीन नवाब, बुशरा परवीन, अर्शिया नाज जहूर अली खान, काशिफ अहमद वहीद अहमद, शेख उस्मान शेख अहमद, जुनैद अयाज अहमद, अजहर मुख्तार अहमद, शिरीन नाज हैदर अकील खान, फरहाना बेगम माजिद बेग, शेख मस्तान अब्दुल गणी, अर्सलानोद्दीन शुजाओद्दीन फारुकी, फैजान खान पीर खान, जैबुननिसा आणि मोहम्मद इक्बाल यांनी परिश्रम घेतले.
0 Comments