नांदगाव तालुक्यातील किसान माध्यमिक विद्यालय वाखारी या शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा मार्च २०२५ चा निकाल ९६.४२% लागला असून, विद्यालयातील ५७ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नेहमीप्रमाणे प्रथम पाच क्रमांक मुलींनी बाजी मारत वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सिद्धी शरद चव्हाण ९२.४०% व वैष्णवी विजय अहिरे ९२.४०% यांनी समान गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
अश्विनी आबासाहेब शेवाळे ९२.२०% हिने गुण मिळवत व्दितीय क्रमांक मिळवला तर समीक्षा सोपान काकळीज हिने ९१.४०% तृतीय आणि वैष्णवी निवृत्ती काकळीज ८९.२०% चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला आणि सर्व मंडळ पदाधिकारी, शालेय समितीचे अध्यक्ष विजय जी चोपडा तसेच
पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाऊसाहेब खैरनार शाळेचे मुख्याध्यापक खंडू खालकर
आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच येथील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments