कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या CBSE परीक्षा 2025 चा 100% निकाल..

 Bay- team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील श्री.माणिकचंद जगन्नाथ कासलीवाल एज्यू.संस्थेच्या श्री.जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या CBSE परीक्षा 2025 चा 100% निकाल श्री.जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या कु.रसिका मेडतिया हिने 90% टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे.


 तर कु. श्रावणी गायकवाड 89% टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर तृतीय क्रमांक आणि कु क्रांती इंगोले 86 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

तसेच कु. गुण कवडे 83 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर कु. मयुरी चव्हाण, सार्थक मताडे, वैष्णवी पाटील व प्रगती पगार ह्या विद्यार्थ्यांनी 81 टक्के गुण मिळवून पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरले.

 तसेच श्रावणी गायकवाड, गुण कवडे, आणि क्रांती इंगोले या विद्यार्थिनींनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी( IT ) या विषयांमध्ये 💯 पैकी 💯 गुण मिळवत उत्तुंग निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यालयास वैभव प्राप्त करून दिले. यावर्षी CBSE बोर्ड परीक्षेस 32 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, प्राचार्य यांचे संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमार कासलीवाल, सचिव श्री विजयकुमार चोपडा, सहसचिव सौ. प्रमिलाताई कासलीवाल, श्री. रिकबकाका कासलीवाल, सुशिलभाऊ कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदीवाल, मार्गदर्शक श्री. गुप्ता सर प्राचार्य मनी चावला, मुख्याध्यापक (माध्य.) श्री. शरद पवार,गोरख डफाळ, मुख्याध्यापक (प्राथ) विशाल सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments