कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील यशोदा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा आदर्श माता पुरस्कार नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील आशाबाई भिकन अहिरे यांना जाहीर करण्यात आला आहे त्यांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांच्यावर राजकीय सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
सविस्तर वृत्त असे की , अहिल्या नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील यशोदा प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून आई-वडिलांच्या स्मरणार्थ दरवर्षी साहित्यासाठी भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यकांसाठी साहित्यप्रभा पुरस्कार तसेच आदर्श माता पुरस्कार हा देण्यात येत असतो यावर्षीचा आदर्श माता पुरस्कार नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील आशाबाई भिकन अहिरे यांना जाहीर करण्यात आला आहे त्यांचा मोठा मुलगा राहुल भिकन आहिरे हा आत्मा मालीक ध्यान पीठ येथे जनसंपर्क कार्यालयात सेवा देत आहे. तर लहान मुलगा गौतम भिकन आहिरे हे मालेगाव येथे पोलिस हेड कॉन्स्टेबल पदावर असुन बॉम्ब शोधक पथकात कार्यरत आहे.
आदर्श माता पुरस्काराचा वितरण सोहळा ४ जून २०२५ रोजी दुपारी दीड वाजता पांडुरंग लॉन्स कोपरगाव येवला महामार्ग पिंपळगाव जलाल तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी देण्यात येणार आहे.
0 Comments