मनमाड येथे भव्य ‘तिरंगा पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 Bay- team aavaj marathi 

भागवत झाल्टे पत्रकार मनमाड (नाशिक)

मनमाड येथे भव्य ‘तिरंगा पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भारतीय लष्कराच्या जवानांना मान सन्मान आणि राष्ट्रीय एकतेसाठी पुढाकाराने मनमाड येथे दि. २० मे रोजी राष्ट्रीय एकता आणि भारतीय लष्करातील जवानांच्या सन्मानार्थ सायंकाळी ५ वाजता भव्य ‘तिरंगा पदयात्रा’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “भारत माता की जय”,“वंदे मातरम्”च्या घोषणांनी नागरिकांनी शहराचा परिसर दणाणून सोडला होता.

ही पदयात्रा श्री रु्द्र हनुमान मंदिर पासून सुरू झाली होती महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंडियन हार्ट स्पॉट, मनमाड रेल्वे स्टेशन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेहरू चौक, मार्गे सन्मार्ग एकात्मता चौकात सांगता झाली. याप्रसंगी प्रमुख वक्त्यांचे श्रद्धांजलीपर भाषणं झाली.

या यात्रेमध्ये मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, व्यापारी वर्ग, कामगार, डॉक्टर्स, वकील, शासकीय कर्मचारी, अधिकारी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या यात्रेची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




Post a Comment

0 Comments