जातेगाव येथे विवाहितेची आत्महत्या अकस्मात मृत्यूची नोंद

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विवाहिता अर्चना संतोष तुपे (वय ३५) हिने आपल्या रहाते घराच्या छताच्या पत्र्याच्या पाईप ला शनिवार दि.२४ रोजी रात्री ११ वाजेच्या नंतर गळफास घेतला. या घटनेची माहिती रविवार दि २५ रोजी सकाळी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून अर्चना तुपे हिला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तीला मयत घोषित केले. तीचे शवविच्छेदन करून चार वाजेच्या दरम्यान जातेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वरील घटनेची माहिती मयत अर्चना तुपे हिचा भाऊ युवराज शांताराम सोनवणे (वय २५) रा वाकला ता वैजापूर जि. छ.संभाजी नगर याने नांदगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३७/२०२५ नुसार १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशवराव सुर्यवंशी, पोलिस कॉन्स्टेबल परमेश्वर श्रीखंडे हे करत आहे.

Post a Comment

0 Comments