आ. कांदे यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात क्रीडा संकुलामध्ये सुविधांसाठी भरीव निधी मंजूर गरज पडल्यास आनखी निधी उपलब्ध करुन देणार - आ कांदे

Bay -team aavaj marathi 

भरत पारख पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यात तरुणांना क्रीडा क्षेत्रात सराव करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना तालुक्यातील अनेक तरुणांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळविले असल्याची माहिती आ सुहास अण्णा कांदे यांनी राज्याचे क्रीडा मंत्री मा.श्री. दत्तात्रय भरणे यांना देवून मतदार संघात विविध क्रीडा साहित्य व सोयी सुविधांसाठी मिळाव्यात यासाठी प्रस्ताव सादर करुन भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मागणी केली असता मंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी पाच कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, आ. सुहास अण्णा कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील असंख्य विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवल्याची माहिती क्रीडा मंत्री महोदयांना दिली. विशेष सुविधा नसतानाही मतदारसंघातील खेळाडूंनी मोठे प्राविण्य मिळवलेले आहे. म्हणूनच विविध क्रीडा प्रकारांचे साहित्य व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिताचा प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच नांदगांव हे तालुक्याचे ठिकाण असलेले शहर असुन येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे.परंतु या क्रीडा संकुलामध्ये अनेक अडचणी असुन खेळाडूंना प्रशिक्षण घेण्यासाठी व सराव करण्यासाठी साधन साहित्य व सोयी सुविधा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे तालुक्यातील मनमाड हे एक ते दीड लाख लोकसंख्या असलेले शहर असुन येथे महर्षी वाल्मिकी संकुलामध्ये योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात. नांदगांव व मनमाड येथे कबड्डी, कुस्ती यांसारख्या खेळांचे मोठ्याप्रमाणात आयोजन केले जात असुन तालुक्यात अनेक खेळाडू आहे. परंतु या खेळाडूंना सरावासाठी योग्य सोयीसुविधांचा अभाव आहे. असे असतानाही तालुक्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे असे सांगितले.या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सुहास अण्णा कांदे, क्रीडा आयुक्त, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

नांदगांव येथे तालुका क्रीडा संकुल मधील कामे करणे व उडन बसविणे, विविध खेळांची मैदाने, जॉगिंग ट्रॅक, जिम, क्रीडा संकुलाच्या जागेला संरक्षक भिंत, कार्यालयीन इमारत, ड्रेनेज, कुस्ती मॅट, टेबल टेनिस हॉल व टेबल, सोलर पॅनल बसविणे. इत्यादी विषयावर चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मंत्री महोदयांकडे आग्रह केला.त्याचप्रमाणे मनमाड येथे खेळांच्या कोणत्याही विशेष सुविधा उपलब्ध नसतांना देखील मनमाड शहरातील अनेक खेळाडूंनी भारोत्तोलन ( वेटलिफ्टिंग ) सारख्या खेळात प्राविण्य मिळविले असुन राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावर नावलैकिक मिळविला असल्याची माहिती आ सुहास अण्णा यांनी मंत्री महोदयांना दिली.

 प्राप्त झालेल्या निधीतून मनमाड महर्षी वाल्मिकी स्टेडीयम येथे इनडोअर व्यायामशाळा, ज्युडो कराटे कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, चेस, कबड्डी, जीमनास्टिक या इनडोअर खेळांचे साहित्य गॅलरी साठी खुर्चा, तसेच फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, हर्डल, आर्चरी, ५० फुट उंच रॉक क्लाईनिंग वॉल व त्यासाठी लागणारे साहित्य, पुरुषांसाठी व महिलांसाठी ग्रीन जिम, पुरुषांसाठी योगा व हास्य क्लब साठी लॉन, स्त्री यांसाठी योगा व हास्य क्लब साठी लॉन, ४०० मिटर सिंथेटिक ट्रॅक च्या आतील बाजूस आर्टीफिशियल लॉन यांसारख्या आउट डोअर खेळांचे साहित्य व छतावर सोलर पॅनल बसविणे, जलतरण तलाव येथे महिलांसाठी इनडोअर जिम, महिलांसाठी योगा मेडिटेशन हॉल बांधणे व त्या अनुषंगिक कामे, सोलर पॅनल बसविणे, मनमाड येथिल डी. के. पगारे क्रीडा संकुल येथे इनडोअर कबड्डी साहित्य, खेळाडूंसाठी ग्रीन जिम, इनडोअर व्यायाम साहित्य व तर अनुषंगिक कामे करणे, सोलर पॅनल बसविणे इत्यादी आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. तसेच गरज पडल्यास आनखी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे यावेळी आ सुहास अण्णा यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments