कृषी पंपाचे सौर प्लेट वादळात उडाल्या नुकसान

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथे झालेल्या वादळात सौर ऊर्जेच्या प्लेट उडाल्याने शेतकर्याचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई ची मागणी करण्यात आली आहे.

या बाबत माहिती अशी की, सध्या शासन स्तरावर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी याच हेतूने शासनाने सोलर प्लांट योजना सुरू केलेली असून अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे परंतु अशाच एका योजनेत मध्ये वादळवाऱ्यात सौर ऊर्जेच्या प्लेट उडून मोठे नुकसान झाले आहे ही घटना नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथे घडली आहे.

हिसवळ बुद्रुक येथील शेतकरी वाल्मीक गंगाधर भालेराव यांच्या गट नंबर 278 /2/3 या गट नंबर मध्ये शासकीय योजने अंतर्गत शेतात बसविण्यात आला आहे. या सोलर प्लांटच्या  13 प्लेट पैकी दोन प्लेट वादळवऱ्यात पावसात उडाल्याने सोलर प्लेट चे नुकसान झाले आहे याप्रकरणी शेतकरी वाल्मीक भालेराव यांनी बुद्रुकचे ग्राम महसूल अधिकारी व्ही.पी दौंड व ग्रामपंचायत अधिकारी हे सर्व बुद्रुक चे निलेश चव्हाण आणि पंच यांच्या समक्ष सोलर प्लांट वरील उडालेल्या प्लेटचा पंचनामा करून या संदर्भातली कारवाई केलेली आहे. या बाबत सम्बन्धित कंपनी कडून नुकसान झालेल्या प्लेटचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी भालेराव यांनी केलेली आहे नुकत्याच वादळी वारा आणि पावसात झालेल्या वातावरणामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments