शेजारच्या घरांच्या कड्या लावून केल्या दोन घरात घरफोड्या

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगांव 

नांदगाव येथील सिद्धिविनायक नगर आणि सुयोग कॉलनी या मध्यवर्ती वस्तीतून चोरट्यांनी बंद घारांचे कडी कोयंडा, कुलूप तोडून चोरी केली या घटनेमध्ये चोरट्यांनी सोने चांदी आणि रोकड असे लाखो रुपयांची चोरी केलेली आहे. दोन्ही चोरीच्या घटना तीन तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास घडल्या आहेत.
यादरम्यान चोरट्यांनी घरातील चोरी करण्यापूर्वी बाजूच्या गल्लीतील इतर शेजारच्या सर्व घरातुन कोणी आतून बाहेर येऊ नये म्हणून बहुतेक घरांच्या कड्या बाहेरून बंद करून बंद असलेल्या घरांचे कडे कोविंडे तोडून घरफोड्या केल्या आहे.

सविस्तर वृत्त असे की, नांदगाव बस स्थानक व
शहरालगत ही घटना घडली आहे, पगारे यांच्या बंद घराच्या तीन दरवाजाचे कटरने कोंड कापून घरात प्रवेश केला व घरातील सर्व सामानाची उचक पाचक करून घारतील १० ह रूपये रोक व १० भार चांदी आदी मौल्यवान वस्तु चोरी करून पसार झाले.तर दुसऱ्या घटनेत नांदगाव येथीलच सुयोग कॉलनी मध्ये मधुकर डोंगरे यांच्या घरामध्ये देखील चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून दिड तोळा सोन,१ लाख रोख रक्कम,देवघरातील चांदीच्या देवाच्या मुर्त्या चांदीच्या साखळ्या आदी मौल्यवान वस्तू घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

 डोंगरे यांच्या मुलाने सकाळीच बँकेतून रोख रक्कम काढून घरी आणली होती, बहुतेक पाळत ठेवू रात्री चोरांनी त्याच्यावर डल्ला मारला असावा अशी चर्चा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान वरील दोन्ही घटनांबाबत नांदगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरांचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. 



 



Post a Comment

0 Comments