Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव येथील शहीद जाट भगतसिंह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दि.६ जून शुक्रवार रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा
मार्गदर्शनातून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराज यांच्या शिव राज्याभिषेक दिन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबतचे परिपत्रक सर्वच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना प्राप्त झाले होते. त्यानुसार परिपत्रकातील पंचसूत्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक समरसता हा विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
सर्व जाती धर्म, वर्ग आणि पंथ यांच्यात समता,बंधूता, आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक समरसता. यात भेदभाव न करता सर्वांना समान संधी देणे, एकमेकांचा सन्मान करणे आणि समाजात एकात्मता वाढवणे अपेक्षित आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री. नितेश जी शर्मा (शिवभक्त) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रसिद्ध कवी व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे (बालभारती) चे सदस्य, डॉ. अ.फ.भालेराव यांनी भूषविले.
या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री. राहुल शेठ परदेशी, मा.मंगेश सरोदे, सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज भाऊ चोपडे, सौ. कावेरीताई शर्मा, श्री. शरद जाधव, श्री. गणेश अहिरे, संस्थेचे गटनदेशक श्री. एम. डी निकुंभ सर, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा संस्थेचे प्राचार्य श्री. वाय.के.कुलकर्णी यांनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नितीन ठुबे सर व श्री. पी. एस. गायकवाड सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री. ए. आर. मढवई यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. व्ही. एस. बर्वे, सौ. एस. डी. उदावंत, सौ. ए.एस. सुरे, श्रीमती पि. के. साखरे, श्री. एन. एस. सरनाईक, श्री. जी. आर.शिंदे, श्री. एस. एस. तायडे, श्री. एच. सी. भुसारे, सौ टी. एम. जाधव, श्री. आर. आर. गायकवाड, श्री.आर. ए. पवार, श्री.एन. बी. जगताप, श्री.ए. व्ही. पवार, श्री. वसीम शेख, श्रीमती एन.ऐ.अहिरे. आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस व कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सौ. मनीषा वर्मा मॅडम यांच्या व्हिडिओ संदेशाने करण्यात आली होती. शिवव्याख्याते नितीनजी शर्मा यांनी शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंतचे संपूर्ण विचार पुष्प गुंफले. महाराजांची दुर्गनीती,गनिमी कावा,दुर्ग बांधणी तसेच मावळ्यांची जमवाजमव याचे सखोल विश्लेषण केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवी व साहित्यिक माननीय श्री.अ.फ. भालेराव यांनी सामाजिक समरसता हा विषय आपल्या सुमधुर काव्यपंक्तीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला. स्वराज्याचा राज्यकारभार चालवित असताना महाराजांनी सामाजिक समता बंधुता कशाप्रकारे जपली याचे विश्लेषण देखील केले. सामाजिक समतेचे अनेक उदाहरणे व दाखले देऊन, भारतीय संविधानाने सामाजिक समता या विषयाला महत्व देवून अधोरेखीत केले आहे. हे देखील प्रकर्षाने सांगितले. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीविषयी, एका समाज घटका विषयी वाटणारी एकात्मता म्हणजे समरसता किंवा समता होय हे डॉ .भालेराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
0 Comments