मविप्र औ.प्र.संस्थेत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवार दि. ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधीत मंगल प्रभात लोढा मंत्री,कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभरात हा उपक्रम उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील बोरसे तसेच विजय काकळीज होते. तर कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून नांदगाव शहरातील मराठा विद्या प्रसारक समाजाचे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथील प्राध्यापक बी.के.पवार हे मंचावर उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांच्या ऑनलाईन भाषणाने झाली. यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे तसेच भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. 

कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा.बी.के.पवार यांनी पर्यावरण संरक्षण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. पर्यावरणाचा होत असलेला र्हास, अवेळी पर्जन्यवृष्टी, जंगल तोड करून शहरे उभारणी तसेच कारखाने तसेच वाहनांमधील निर्माण होणारे प्रदूषण व त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम हे अत्यंत घातक असून यावर पर्याय म्हणून वेळीच सतर्क होऊन पर्यावरण संरक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करून जास्तीत जास्त झाडे लावून त्यांची देखभाल करणे तसेच परिसराची स्वच्छता ठेवणे तसेच नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे आणि त्याचे पालन करणे हे काळाची गरज असल्याबाबत सांगितले या सोबतच व्याख्याते प्रा.बी.के.पवार यांनी नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार आणि कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचारांचा प्रसार तसेच सामाजिक समरसता, या विषयांवर मौलिक मार्गदर्शन केले. 

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रमुख अतिथी विजय काकळीज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य संघटन करीत असताना तांत्रिक कौशल्यांचा वापर कसा केला. शिव काळापासून ते आजपर्यंत ज्या व्यक्तींकडे तांत्रिक कौशल्य आहेत अशा व्यक्तींना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळेच तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असुन त्यासाठी आय टी आय हा उत्तम पर्याय असल्याचेही विशद केले यासोबतच शिवाजी महाराजांच्या काळातील वेगवेगळे प्रसंग सांगुन शिवरायांच्या जिवनपटाला उजाळा दिला.अध्यक्षीय भाषणानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जेष्ठ सभासद तसेच स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य निवृत्ती खालकर,प्रकाश घोटेकर, बाबुलाल सावंत, अरविंद बोरसे, संजय कदम,न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, पर्यवेक्षक अविनाश साळुंके, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्या पुनम मढे,बाह्य रुग्ण कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा पगार,औ.प्र.संस्था प्राचार्य कैलास जाधव, उपप्राचार्य सोमनाथ ठाकरे या सोबतच विविध आस्थापनांचे शाखाप्रमुख तसेच प्रतिनिधी व संस्थेचे आजी माजी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 

यावेळी औ.प्र.संस्थेत वार्षिक अभ्यासक्रमासोबत इतर उपक्रम राबविले जातात अशा उपक्रमांमधील काही निवडक प्रकल्प प्रदर्शनासाठी ठेवलेले होते. यामध्ये द्वीतीय वर्षे जोडारी विभागातील प्रशिक्षणार्थींनी व्यवसाय निदेशक रमेश बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या प्रकल्पांचे प्रात्यक्षिके करून दाखवले काही प्रकल्प हे यांत्रिकी व विद्युत शाखेचे मिश्र प्रकल्प प्रशिक्षणार्थींनी अतिशय कुशलतेने बनवलेले होते व यावेळी प्रत्येक प्रकल्पाची, प्रात्यक्षिकाची सविस्तर माहिती मान्यवरांना दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कैलास जाधव, सुत्र संचालन राजेंद्र चव्हाण तर आभारप्रदर्शन सागर बोरसे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखेतील सर्व निदेशक, निदेशकेतर सेवक वृंद व प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments