नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे दि ६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मातोश्री वत्सलाबाई वाल्मीक राव तुसे बहुउद्देशीय संस्था नांदगाव, ग्रामपंचायत साकोरा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यासाठी रा.स्व.संघ प्रणित जनकल्याण ब्लड बँक नाशिक यांच्यावतीने रक्तदानाचे नियोजन करण्यात आले.
याप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा व आरती करण्यात आली तसेच राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गंध व पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ४० नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एनीमिया मुक्त भारत अभियानाच्या च्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो.
यावेळी सरपंच किरण रमेश बोरसे, जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे, कृ.उ. बाजार समिती मा.सभापती श्री.सतीश भाऊ बोरसे, ग्रामपंचायत सदस्य, मातोश्री वत्सलाबाई वाल्मिकराव तुसे संस्था व विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदगाव येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. हर्षद सुनील तुसे, अमोल हिरे, रा.स्व.संघ नांदगाव शहर उपखंड प्रमुख अतुल जोशी, जनकल्याण रक्त पेढी नाशिकचे टीम व साकोरा ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments