नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे शनिवार दि १४ रोजी दुपारी २- अडीच वाजे च्या सुमारास येथील अल्पभूधारक शेतकरी बाळु दौलत पवार शेतात काम करत असताना अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी बाळु पवार यांनी आपल्या शेतातील घरापासून अंदाजे ३०० फुट अंतरावर बैल बांधून घरात गेले असता काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला व यातच शेतात बांधलेल्या सात वर्ष वयाच्या बैलाच्या अंगावर विज पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच येथील माजी उपसरपंच संतोष डांगे यांनी तत्काळ तलाठी दिनेश परदेशी व पशुधन विकास अधिकारी डॉ.ए.आर. देवकर संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. धिरज यादव यांना घटनास्थळी जावून पाहाणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.त्यावरुन पशुधन पर्यवेक्षक यादव यांनी बैलाची तपासणी करून मृत घोषित केले व शवविच्छेदन करून अहवाल सादर केला.
यावेळी पंचायत समिती नांदगाव चेडॉ.एन.टी.ताठे, पशुधन विकास (विस्तार अधिकारी) यांनी पंचनामा करून गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना सादर केला, असे संतोष डांगे यांनी सांगितले. घडलेल्या घटनेमुळे चंदनपुरी येथे हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी पवार हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
0 Comments