आ.कांदे यांच्या अध्यक्षतेखाली विमुक्त जाती व जमाती कल्याण समितीची प्रारंभिक बैठक संपन्न

 Bay- team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील विधानभवनात राज्याच्या विमुक्त जाती व जमाती कल्याण समितीची प्रारंभिक बैठक पार पडली. या बैठकीस समितीच्या सर्व सदस्य आमदारांनी हजेरी लावली. 

या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. एकूण 11 टक्के लोकसंख्या असलेल्या विमुक्त व भटक्या जमातीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद उपलब्ध होत नाही यासाठी निधी वाढविण्यात कमी राज्याच्या मुख्यमंत्री उप मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची समितीचे अध्यक्ष आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले. 

 यापूर्वी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कल्याण समिती अध्यक्ष स्वतंत्र कार्यालयात प्रवेश करत कार्यभार हाती घेतला. यावेळी सौ अंजुमताई कांदे फरहान दादा खान हे उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments