नांदगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे होलार समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नंदकुमार केंगार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील भाऊ जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनील जी ढोबळे, महिला जिल्हाध्यक्ष रेखा शेलार व सामाजिक कार्यकर्ते रवी माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत होलार समाजाचे नाशिक जिल्हा अध्यक्षपदी रविंद्र सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली...
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे सचिव म्हणून युवराज सोनवणे जिल्हा संघटक म्हणून बाली सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख म्हणून राजेंद्र जाधव इत्यादी पदाधिकार्यांची देखील निवड करण्यात आली.
याप्रसंगी वाल्मीक जगताप ॲड. सचिन जी साळवे आणि आरपीआयचे महावीर जाधव व पिंटू सोळशे, मुस्ताक भाई शेख हे होलार समाज बांधव आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकारी आणि मान्यवरांनी रविंद्र सोनवणे व निवड करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान करुन पुढील कार्यकालासाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments