किसान माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात

 Bay -team aavaj marathi 

विजय जी चोपडा जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

किसान माध्यमिक विद्यालय वाखारी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण  करण्यात आले. याप्रसंगी  विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष विजय चोपडा उपस्थित होते. तसेच एस.एस.सी. परीक्षा मार्च 2025 ला विद्यालयात प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळासारख्या शैक्षणिक क्षेत्रात चांगले नाव लौकिक असणाऱ्या आणि परिसरात चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे, याबद्दल चोपडा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांचे हस्ते नवीन प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्वागता निमित्त गोड लापशी आणि खिचडी देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील हिंगमिरे यांनी केले. मुख्याध्यापक के.व्ही. खालकर सरांनी शाळेतील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन रत्नप्रभा पाटील यांनी केले.

 मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू दवंगे, ऋषीकुमार डोमाडे, दिलीप भडांगे, योगेश कुलकर्णी, ज्योत्स्ना चव्हाण, प्रशांत वाघ यांनी प्रयत्न केले.



Post a Comment

0 Comments