नांदगाव येथे जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व जायंट्स ग्रुप ऑफ नांदगावचा पदग्रहण सोहळा संपन्न

 Bay--team aavaj marathi 

नांदगाव येथे जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व जायंट्स ग्रुप ऑफ नांदगावचा पदग्रहण सोहळा समाजसेविका सौ.अंजुमताई कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.

 
यावेळी सौ.कांदे यांनी मनोगत व्यक्त करताना दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून होत असलेल्या समाज कार्याचा गौरव केला,आणि पुढिल कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. सौ.कांदे यांच्या हस्ते जायंट्स ग्रुप ऑफ नांदगावच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या रामनिवास करवा यांचा सत्कार करण्यात आला.

 उपस्थित मान्यवरांनी जायंट्स ग्रुप ऑफ नांदगाव करत असलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली, याप्रसंगीमाहेश्वरी समाजाचे जिल्हा अध्यक्ष उमेश मुंदडा, विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, संजय गुगळे, अमित मालानी, दत्तराज छाजेड, सोमनाथ दुसाने, प्रकल्प पाटील, प्रसाद बुरकुल, राजेंद्र दुसाने, मनोज चोपडा, राजकुमार संत, कुणाल खरोटे, सोमनाथ घोंगाने, वामन पोतदार, अनिल करवा, विजय बागोरे, रुपाली भावसार, ज्योती करवा, सुनीता बागोरे, वंदना कवडे, शकुंतला शिंदे, श्रीमती शकुंतला कवडे, छाया परदेशी, योगिता खरोटे आदिंसह ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments