साकोरा गांव आडीच महिण्यापासून पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे .उपाय योजना माञ शुन्य?

 Bay--team aavaj marathi

जेष्ठ पत्रकार मारुती जगधने नांदगांव :- 

नांदगाव तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे असलेल्या साकोरा येथे मागील अडीच वर्षांपासून पाणी टंचाई भेडसावत असून, आनेक दिवसाच्या प्रतिक्षे नंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणारा आसल्याची बातमी नागरिकांच्या कानावर पडली ती खरी ठरो या साठी नागरीक रोज कपालेश्वर महादेव मंदिराच्या पिंडीवर पाणी घालण्याचे कांम श्रध्देने व मनोभावे करीत आहे कारण दि ५ एप्रिला साकोरा गांवची पाणी योजना कार्यन्वीत होणार आहे .गत दोन आडीच महिण्यापासून गांव पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. 

नांदगांव तालुक्यात क्रमांकाची एक लोकसंख्या असलेले सर्वात मोठे गांव आहे, या गांवाची लोकसंख्या सुमारे १८ हजार असलेले साकोरा गांव जिल्हा परिषदेचा गट आणी गण देखील आहे या गावाला आजतागायत तिन पाणी योजना राबविल्या पण त्या कालबाह्य झाल्या आता नव्याने शास्वत पाणी योजना राबविण्याचे कामं हाती घेतले आहे या साठी शासनाने साकोरा गावासाठी ४ कोटी ९२'लाखाची योजना हाती घेतली हि योजना आत्ता पर्यंत पूर्ण व्हायला हवी होती.

 पण ठेकेदाराच्या आले मना तेथे गावाचे व पुढार्यांचे अधिकार्यांचे काही एक चालेना अशी गत झाली आहे ? या साठी गावात नुकतीच ग्रांमसभा घेण्यात आली या सभेला फक्त ५ ग्रा.प.सदस्ये उपस्थित होते. १८ सदस्य असलेली साकोरा ग्रांमपंचायत आहे येथे ८ महिला सदस्या आहेत पण पाण्यासारख्या गंभीर ज्वलंत प्रश्नासाठी बोलवलेल्या ग्राम सभेला एकच महिला उपस्थित होत्या हे गावाचे नसीब म्हणावे का? दोन महिने झाले गावाला पाण्याचा थेंब नाही सन १९७२,१९८२ हुन बिकट आवस्था गावाची झाली त्या काळात साकोरा गावाच्या तीरावरील शाकंबरी नदीच्या किणारी असलेल्या दोन विहिरींचे पाणी हौदात पडायचे आणी त्या दोन हौदातुन राञंदिवस लोक डोक्यावर हंड्याने कवाडीने किंवा सायकल वर पाणी वाहून नेत असत हि सवय तेव्हा नागरीकाना होती तेव्हाची लोकसंख्या जेमतेम ७ ते ८ हजार होती.आज त्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे आणी आता पाणी नसल्याने तिन चार टँकरच्या मदतीने हौदात पाणी पडते ज्याच घर जवळ त्याला मुबलक पाणी मिळते ज्याचे घर लांबा त्याची पाण्यासाठी बोंबाबोंब हौदातुन पाणी भरताना हंड्याला हंडा लागतो आणी पाणवट्यावर रोज लाहान मोठी भांडण पाण्यासाठी होतात.

 सध्या गावाच्या चार बाजूला चार हौद बांधले आहे त्यात पाणी पडत. पण ज्यांचे घर गावाच्या मध्यभागी आहे त्याला टँकर केव्हा येतो आणी पाणी टाकून जातो ते कळत नाही हि एक डोकेदुखी झाली आहे येथील लोकसंख्या सुमारे सोळा हजार आहे. 

सध्या साकोरा गावात १ ह लि पाण्याला २५०₹ मोजावे लागतात गावात १० ते १२ पाणी वाहतूक करणारी छोटी छोटी वाहने आहेत ते गावाची कशीबशी तहान भागवतात गावासाठी राबविण्यात येणारी पाणी योजना रखडल्याने साकोरा येथील नागरिक पाणी टंचाईच्या झळा सोसत आहे. भविष्यातील विचार करून सुमारे पाच कोटीची योजना मंजुर करण्यात आली आहे, बरेचसे कामं झाले पण आजुन ते पुर्णत्वास जात नाही घोड हे कोणाच्या लक्षात येईना 

आमदार सुहास कांदे यांच्या सहकार्याने गिरणा धरणातुन शास्वत पाणी योजना राबवली जात आहे. सध्या गावाला टँकरने पाणी वाटप होते ते ही पुरातन कालबाह्य पध्दतीने, या गावाला सन २०१४ मध्ये रोज पाणी येत होते. तालुक्यात सर्वात मोठे असलेल्या गावाला कोण वाली राहिला नाहि लोक खंत व्यक्त करतात. पुढारी लक्ष देत नाही संबधित ठेकेदारने काम पूर्ण केले नाही .अशी मौखिक ओरड करात सध्या ३ टँकर च्या मदतीने १ लाख २०ह लि पाणी चार हौदात पडताच अर्ध्या तासात हौद कोरडा होतो. एकाच वेळेला शेकडो भांडे हौदात पडतात, आता नव्याने दोन चौकात हौदाची मागणी आहे. गावासाठी गिरणा धरणातुन १४ किमी अंतराहुन पाईप लाईन पाण्याच्या टाकी पर्यंत येणार आहे, या योजनेचे मुल्यांकन ४ कोटी ९२ लाखाची आहे. हि राबविली जाणारी पाणी योजना ही सन २०३७ पर्यंतची वाढिव लोकसंख्या लक्षात घेता करण्यात येत आहे, एकंदरीत गावाची तृष्णा भागविनारी शास्वत योजना तत्काळा राबवून गावाला पाणी पुरवठा करण्याची मागणी सर्व थरातुन होत आहे.

प्रतिक्रिया : दोष देण्या एैवजी काम करुन घेणे बरे ठेकेदारने ५ एप्रिला पाणी देणार असल्याचे आश्वासन ग्रांमसभेत दिले आहे विजेचा खोंळंबा आला होता आता वीज पोल टाकण्याचे काम चालू आहे. २५ HP चे दोन विज पंप बसविले आहे या योजनेतून साकोरा गावाची लवकरच तहान भागविली जाणार : विद्यमान आमदार यांच्या मदतीने ही योजना साकारते आहे .
 रमेश उग्रसेन बोरसे माजी जि प सदस्य साकोरा गट

Post a Comment

0 Comments