नांदगाव तालुक्यावर मागीलवर्षी वरुन राजा कोपल्याने तालुक्यातील व घाटमाथ्यावरील पाझर तलाव कोरडे ठाक पडले असून जवळपास ७०% पेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या आणि सर्वच ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनी तळ गाठले आहे, तर बर्याच विहिरी कोरड्या पडल्या आहेत. शेतात राहणाऱ्या तसेच गावात राहणाऱ्या नागरिकांना स्वतः साठी पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ मागील एक महिन्यापासून आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागीलवर्षी वरुन राजा कोपल्याने तालुक्यातील व घाटमाथ्यावरील ऊस तोड मजूर आणि केव्हा ही ऊस तोडणीसाठी न गेलेले अनेक शेतकरी हाताला काम मिळावे व आपल्या पशू धनाचे पोट भरावे हा हेतू नजरेसमोर ठेवून ऊस तोडणीच्या कामासाठी गेले होते.
असे ऊस तोडणीसाठी गेलेल्या नागरिकांची संख्या या वर्षी सरासरी ५०% नागरिक गेले होते, ते सर्व उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेले नागरिक ज्या भागात ऊस तोडणीसाठी गेले होते,त्या भागात काही ठिकाणी पाण्याची टंचाई तर काही ठिकाणी पशुधनाच्या भविष्यात चार्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने जनावरांना खाऊ घालण्यासाठी ऊस राखून ठेवल्याने या वर्षी राज्यातील अनेक ठिकाणचे साखर कारखाने मागील आठवड्यापासून बंद झाले आहेत.
ढेकू येथील ऊस तोड मजूर ठेकेदार बाबू तोताराम चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या मार्च महिना अखेर पर्यंत राज्यातील सुमारे ८०% साखर कारखाने बंद होणार असून १५ एप्रिल पर्यंत जवळपास सर्वच साखर कारखाने बंद होतील. परिणामी उदरनिर्वाह करण्यासाठी गेलेले नागरिक आपापल्या गावी परतत आहेत.
शेतात राहणाऱ्या तसेच गावात राहणाऱ्या नागरिकांना स्वतः साठी पशुधन पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ मागील एक महिन्यापासून आली आहे. त्यातच उदरनिर्वाहासाठी बाहेर गावी गेलेले नागरिक पुन्हा गावी परतत असल्याने ग्रामपंचायत मालकीच्या आगोदर असलेल्या आणि जल जीवन मिशन अंतर्गत नव्याने झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाणी पुरवठा योजना पूर्णतः कोलमल्या आहेत.
त्यामुळे घाटमाथ्यावरील कुसूमतेल,ढेकू खु/ बुद्रुक, ढेकू तांडा, जातेगाव, वसंत नगर एक व दोन, चंदणपूरी, लोढरे, बोलठाण, जवळकी, गोंडेगाव, आणि रोहिले ह्या बारा गावात भिषण पाणी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
0 Comments