टाकळी बुद्रुक येथे सामाजिक सभामंडपाचे उद्घाटन संपन्न..

 Bay--team aavaj marathi 

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून टाकळी बुद्रुक येथील शनी मंदिरा समोर सामाजिक सभागृहाचे (सभा मंडप) मंजूर करण्यात आला होता या सभा मंडपाची भूमिपूजन बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांच्या हस्ते शुक्रवार दि.१५ रोजी करण्यात आले.  


ग्रामीण भागात सामाजिक सभागृह हे लग्न कार्य किंवा सामाजिक, धार्मिक कार्यासाठी किंवा इतर व कार्यक्रमासाठी मंडप म्हणा किंवा लान्सचे भाडे आज गगनाला भिडले आहेत. . दृष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनाच हा खर्च परवडत नाही ही बाब लक्षात आल्याने आ. सुहास कांदे यांनी संपूर्ण विधानसभा मतदार संघातल्या प्रत्येक गावात, वाड्या, वस्त्या, मंदिरासमोर शेकडो सभामंडप बांधून गोरगरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.


आज तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे सभामंडपाचे भूमिपूजन बाजार समितीचे माजी सभापती तेज कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप पवार, युवासेनेचे सागर हिरे, संचालक एकनाथ सदगीर, प्रकाश शिंदे, बाळासाहेब पवार, विक्रम फोडसे, रामेश्वर सदगीर, माणिक आहेर, पोलीस पाटील बाबुराव पवार, उत्तम पवार, साहेबराव पवार, वाल्मिक घोडके, बाबासाहेब पवार, विश्वास पवार, भाऊसाहेब शिरसाठ, चेतन खैरनार, संजय घोडके, समाधान पवार, आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments