दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना आंमली पदर्था संदर्भात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली, या घटने संदर्भात दि २५ जुन रोजी नांदगांव मानमाड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. या प्रसंगी विविध राजकीय पक्षा चे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते नागरिक यांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदवून संतोष गुप्ता यांच्यावर खोटो गुन्हा नोंदवून त्यांना आकसाने सुडापोटी गोवण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या घटनेचा नांदगांव येथे जाहिर निषेध करुन रास्तारोको आंदोलन करण्यात आला, व तहसिलादारांना त्याबाबत निवेदन देण्यात आले. वरील घटनेचा सर्व स्तरातून तीव्र निषेध करण्यात येत आहे. तसेच सखोल चौकशी करून संतोश गुप्ता यांना मुक्त करण्याची मागणी या वेळी काढलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने मोर्चाच्या वेळी करण्यात आली .
याप्रसंगी तालुक्याचे माजी आमदार अनिल आहेर, श्रावण आढाव , विनोद शेलार, महेंद्र बोरसे, विशाल वडगुले, संतोष बळीद, दिपक खैरनार, कमलेश पेहेरे, सुर्वे, आदिसह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते नेते उपस्थित होते. यावेळी पो. नि. प्रितम चौधरी यांनी चोक बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
0 Comments