आरक्षनाचे जनक, दिन दलित, गोर गरीबांचा कैवारी लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती.२६ जुन हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणून साजरा केला जातो. सर्वसामान्याना, बहुजनांना स्वाभिमानाने नव जीवन देणारे, अस्पृष्यता निर्मूलन, निवारण, स्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारे व आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजाच्या उद्धारासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते. माणसांमधला राजा, 'आरक्षनाधीश' लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमातील फलकावर छत्रपती शाहू महाराज रेखाटनातून हुबेहूब चित्र रेखाटून महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीनेआगळे वेगळे विनम्र अभिवादन केले. हिरे यांनी रेखाटलेल्या छ. शाहू महाराजाचे चित्र बघून गावातील नागरिक व पालकांनी यांचे कौतुक केले.
0 Comments