गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानावर मारला ग्रामसेवकांनी डल्ला चौकशीची मागणी

aavaj marathi Bay team

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार आणि सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक) यांचेकडून 


नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील नोव्हेंबर 2023 मध्ये जी गारपीट झाली त्या गारपीटच्या बदल्यात राज्य शासनाने दिलेल्या अनुदानावर येथील ग्रामसेवक सुभाष फत्तु चव्हाण यांनी डल्ला मारल्याने येथील शेतकरी भास्कर लक्ष्मण आहेर आणि इतर शेतकरी बांधवांनी वारंवार निवेदने देऊन चौकशी मागणी केली होती. परंतु शासन स्तरावरून काही प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर लोकशाही मार्गाने उपोषण करण्याची वेळ येथील शेतकरी बांधवांवर आली आहे.



या बाबत सविस्तर वृत्त असे की, मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि झालेल्या गारपिटीने तालुक्यातील बर्याच गावात शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तत्कालीन केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचे स्वियसहाय्यक, आ. सुहास अण्णा कांदे, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी प्रत्यक्ष पाहाणी करून झालेल्या नुकसानीचा शासनास अहवाल सादर केला होता. त्याअनुषंगाने शासन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई म्हणून काही रक्कम मंजूर केली होती.


परंतु नांदगाव तालुक्यातील मांडवड गावातील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक यांनी शासनाने शेतकरी बांधवांना मंजूर केलेल्या अनुदानात अपहार करुन आपली तुंबडी भरली असल्याचे उपोषण कर्ते शेतकरी भास्कर आहेर यांनी माहिती उपोषन प्रसंगी दिली.

या घटनेची  प्रशासकीय पातळीवर  दखल घेत नसल्याने मांडवड ग्रामस्थांनी  ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मुळात ज्याच्या नावावर शेती आहे त्यांना 10 हजार आठशे रुपये ऐवजी 5 हजार चारशेच रुपये अनुदान दिले. आणि याच शेतकऱ्यांच्या नावावर ग्रामसेवकांनी त्यांची पत्नी, साला, भाऊ यासह मित्रपरिवाराच्या नावावर 55 ते 70 हजार रुपये अनुदान काढले आहे. या सर्व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी उपोषणकर्त्यानी केली आहे. शिवसेनेचे नाशिक ग्रामिण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन पालकमंत्री दादाजी भुसे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत फोनवर चर्चा करून या घटनेची माहिती दिली. मंत्री भुसे यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. माञ उपोषन सुरूच असल्याने सदर ग्रामसेवकावर कारवाईची मागणी करुन सदर गैर व्यवहारातील पैसे शेतकर्याना त्याचे नावे मिळावे अशी मागणी या वेळी आंदोलकांनी लाऊन धरली असून उपोषन कायम ठेवले आहे.


Post a Comment

0 Comments