Bay team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या तांबेवाडीत आ. सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने आज शनिवार दि २२ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर आ. सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नामुळे परिवहन महामंडळाची बस (एसटी) असल्याचे पाहून नागरिक अचंबित झाले, त्यांनी आलेल्या बसची विधीवत पूजा करून चालक वाहकाचा सन्मान केला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य परिवहन मंडळाची बस तांबे वाडी येथे शनिवारी सकाळी येताच बस पाहून ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तर आता तालुक्याच्या गावी शिकायला मिळणार म्हणून विद्यार्थ्यांनी नाचून आनंद साजरा केला.
नांदगाव शहरापासून अवघ्या १० ते १२ किलोमीटर वर टाकळी गाव आहे. आणि तेथून दोन ते तीन किलोमीटर वर तांबेवाडी नामक छोटे गाव आहे. मेंढपाळ लोकांच्या बहुसंख्येने वास्तव्य असलेल्या या गावात अनेक सुविधा अजून पोहचलेल्या नाहीत. त्यापैकी बस या शासकीय सुविधेचा समावेश होता.मात्र आ. सुहास आण्णा कांदे यांच्याकडे येथील काही ग्रामस्थांनी वरील व्यथा मांडली व विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसानी बाबत सांगितले.
0 Comments