पिंप्राळा ग्रामपंचायतीच्या ठरलेल्या आवर्तनानुसार बाळू तुळशीराम सदगीर यांनी राजीनामा दिल्याने या पदावर सौ. कविता बाळकृष्ण बिन्नर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बिरूदेव सोमा आयनोर यांची निवड झाल्याने त्यांचा ही सत्कार आमदार सुहास कांदे यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
या प्रसंगी संपूर्ण मतदार संघात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.व हा विकासाचा रथ असाच अविरत धावणार आहे. तुम्ही मागाल ते काम मी तुम्हाला देईल. तुमच्या गावाच्या विकासासाठी कायम सहकार्य केले जाईल. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले. व गावाच्या विकासाविषयी मार्गदर्शन केले.
तसेच याप्रसंगी भगवान सातपुते, काळू शिंदे, महादू उशिरे, डॉ. बन्सी सदगीर, छगन सदगीर, साहेबराव कारंडे,कैलास निकम, खंडू कोळेकर, राजाराम गांगुर्डे, भगवान पांढरे, अण्णा सदगीर, भाऊसाहेब ढोणे, वाल्मिक निकम आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments