नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील प्रमोद जिभाऊ बोरसे वय ४१ या शेतकर्याने आर्थीक विवंचनेला कंटाळून शाकंबरी नदी पाञातील खोल डोहात उडीघेत जीवन याञा संपविली, या घटनेमुळे साकोरा गावात शोककळा पसरली आहे.
या संदर्भात सविस्तर असे की साकोरा परिसरात गेल्या दोन वर्षांपासून सततची नापिकी, हिंमवर्षाव, दुष्काळी परिस्थिती मुलांचे शिक्षण यामुळे झालेल्या आर्थीक आडचणीत झालेल्या कर्जाला कंटाळून प्रमोद (मिर्झा) जिभाऊ बोरसे (वय४१) या तरुण शेतकऱ्याने दि. २० रोजी रात्री चांदोरा मार्गालगत असलेल्या शाकांबरी नदिवरील बाळगोंदाई माता मंदिराल गतच्या पाण्याच्या डोहात उडी घेतली.
दुसर्या दिवसी शुक्रवारी सकाळी वटसावित्री पौर्णिमे निमित्त काही महिला पुजेसाठी या भागात गेल्या असता मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या आवस्थेत दिसला त्यांनी शेजारी शेतात असलेले भारत बोरसे व शरद सोनवणे यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी नांदगाव पोलिसांत खबर दिली असता, पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह अंत्नायविधी साठी तेवाईकांच्या ताब्यात दिला.प्रमोदच्या पश्चात आई वडिल, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.वरील घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
0 Comments