मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव अकॅडमी मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी नांदगाव येथील होरायझन अकॅडमीत विद्यार्थ्यांनी मविप्र संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात योगदिनाचे औचित्य साधुन दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वेगवेगळ्या योगासनांची वेगवेगळी आसने केली.
त्यात अनुलोवीलोम, कपालभारती, भ्रामारी इ. प्राणायाम सह ताडासन, वृक्षासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, वज्रासन, शशांकसन, वक्रासन आदी सारखे योगासने विद्यार्थ्यां तसेच शिक्षकांनी केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी शुभेच्छा दिल्या,तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
अकॅडमीच्या प्राचार्या पी.डी.मढे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. होरायझन अकॅडमीतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योगासनांचे फायदे याबद्दल माहिती होरायझन अकॅडमीचे क्रीडा शिक्षक पी. एस.वडघुले यांनी दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
0 Comments