नांदगाव तालुक्यातील जामधरी शिवारातील गोपाळा नामक परिसरात काल सोमवारी दुपारी वीज कोसळून दोन शेळ्या व एका मेंढ्याचा मृत्यू झाला,यावेळी मेंढपाळ किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आ. सुहास कांदे यांनी तत्काळ तहसीलदारांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. व मदतीबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.
काल दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरु झाला, त्यावेळी भिकाजी तांबे यांच्या शेळ्या, मेंढ्या या परिसरात चरत होत्या. यावेळी या मेंढ्यावर वीज कोसळली त्यात दोन मोठ्या शेळ्या, एक नर मेंढा जागीच ठार झाले. तर जवळ असलेला सोनू गोटे हा किरकोळ भाजला. या घटनेची माहिती मिळताच आ.सुहास कांदे यांनी प्रतिनिधी राजेश शिंदे यांना पाठवून घटनेची माहिती घेतली.तलाठी श्रीखंडे यांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा करून तहसीलदार सुनील सौंदाणे यांना सादर केला.
0 Comments