बोलठाण बातमीदार दि. २५.... नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर गंगाधर नवले वय ६८ वर्ष यांचे सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने रहाते घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
दिनकर अण्णा नवले हे तालुक्यात दिनुअण्णा नावाने प्रसिद्ध होते, त्यांचे सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते. त्यांनी बोलठाण येथील बंद पडलेली उपबाजार समिती पुन्हा सुरु करणेसाठी तत्कालीन कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे शिष्टमंडळ नेवून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव यांना भाग पाडून उपबाजार समिती सुरू केली. त्यामुळे पंचक्रोशी तील सर्व शेतकरी बांधवांना शेतमालास योग्य भाव मिळू लागला.
तसेच स्थानिक विकास कामांसाठी देखील दिनकर अण्णा यांचे मोठे योगदान होते. त्याचप्रमाणे त्यांचे धार्मिक क्षेत्रात देखील मोठे योगदान होते. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता येथील अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय पाटील, अमित बोरसे, यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments