नांदगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जयंती निमित्त अभिवादन करुन हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छ. शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला. व या नंतर लगेचच सारनाथ बुद्ध विहार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना नेते फरहान शेख हे होते, कार्यक्रमाची सुरुवात भास्कर निकम, विलास कोतकर, विश्वास आहिरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी छ. शाहु महाराजांच्या प्रतिमेचे डॉ.ख्याती तुसे, वनरक्षक मनिषा पाटील, संगीता वाघ, ॲड.विद्या कसबे, अनिता पाटील यांनी पुजन केले. यानंतर छ. शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने जेष्ठ पत्रकार संजीव धामणे, योगेश (बबलू) पाटील, सागर हिरे, संतोष कांदे, मारुती जगधने, राजू जाधव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
तसेच ॲड.विद्या कसबे, सुनील जाधव, भास्कर निकम, पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे अदींनी आपले मनोगत व्यक्त करुन या सुंदर अशा वृक्षारोपन करुन जयंती निमित्त अभिवादन करुन या संकल्पनेचं कौतुक केले व ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक नितीन जाधव यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत गरुड़ (अध्यक्ष), दीपक मोरे (उपाध्यक्ष) प्रमोद पगारे, किरण पवार, सोमनाथ चौधरी,गौतम काकळीज, सोहेल रंगरेज़, प्रवीण इघे, जफर शेख, राज पवार, अली शेख, स्वप्निल इघे, कुणाल भोसले, गौरव गूढेकर आदी उपस्थित होते,या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार महावीर जाधव यांनी मानले
0 Comments