मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सोशल मीडियावर ट्रोल

 Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने त्यांच्या सरकारच्या कार्यकालातील शेवटच्या अधिवेशनात अर्थसंकल्प मांडतांना अर्थ मंत्री अजित दादा पवार यांनी शेतकरी व जनतेच्या हिताच्या विविध योजनांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वञ बोलबाला होत आसून काय आहे हि योजना या साठी कोणत्या कागद पनाची पूर्तता करावी लागले काय आहे या योजनेच्या नियम अटी जानुन घेऊ या! दरम्यान या योजने संदर्भात उपमुख्यमंञी व अर्थ मंत्री नामदार अजीत पवार यांना सोशल मिडियावर ट्रोल  करण्यात आले आहे.

सोप्या भाषेत समजून घ्या यासाठी पात्र महिला यांचे यांना वय 21 ते 60 वर्षे असावे, त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै पासून सुरुवात होणार आहे, तर त्यांची अंतिम तारीख 15 जुलै ही आहे. योजनेसाठी पात्र महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार यापैकी महिला यांचा समावेश आहे.ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2. 50 हजार रुपये (अडीच लाखापेक्षा) जास्त नसावे, तसेच परिवारात कोणी Tax भरत असेल, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल, कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल, कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल, (ट्रॅक्टर सोडून) तर अशा कुटुंबातील वरील योजनेचा लाभ मिळणार नाही.

ज्यांना वरील योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या महिलांना 
आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घ्यावा असे आवाहान राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरावे लागणार आहेत.

Post a Comment

0 Comments