भारतीय स्वातंत्र्य दिन पेडकाई माता विद्यालयात उत्साह पूर्ण साजरा झाला यावेळी स्कुल कमेटी चेअरमन माजी सरपंच आर झेड बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले .यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पिरनाईक , ग्रामपंचायत सदस्य, माजी मुख्याध्यापक सुर्यभान बोरसे, व्यापारी बबन अमृतकर, अर्जुन सुलाने, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी स्वागत केले तसेच विद्यालयाचे कलाशिक्षक बोरसे एस एस यांनी सुंदर फलक लेखन केले श्रीमती पूनम बोरसे यांनी विद्यार्थीनी सोबत आकर्षक रांगोळ्या काढून परिसर सुशोभित केला कार्यक्रमाचे सुञसंचलन बोरसे आर बी व सत्कार, बक्षिस वितरण क्षीरसागर के एस यांनी केले. आभार बोरसे व्ही पी यांनी मानले .या दरम्यान विद्यालयातील विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले व गुणवंतांचे स्वागत करण्यात आले .
0 Comments