स्व. शरद अण्णा आहेर विद्यालयात"स्वातंत्र दिन" उत्साहात

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव तालुक्यातील मांडवड येथे स्वातंत्र दिनानिमित्त "ध्वजारोहण" मविप्र ज्येष्ठ सभासद विनायक विष्णू आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर शालेय स्कूल कमिटी अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर, गावातील ज्येष्ठ नेते विठ्ठल आबा आहेर, मविप्र सभासद रामराव भाऊ मोहिते, दौलतराव आहेर, शिवाजीराव आहेर, वाल्मीक राव थेटे, प्रकाशराव आहेर, स्कूल कमिटी सदस्य अशोक भाऊ निकम, बापूसाहेब आहेर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. कांबळे एस.एस. यांनी आपल्या प्रास्ताविकातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले, त्या वीरांच्या त्यागाची व बलिदानाची आठवण करून दिली, त्याचबरोबर गावातील शहीद जवान संदीप मोहिते याचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून स्वतंत्र सैनिकांविषयी ऋण व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक हेमंत परदेशी यांनी केले, तर आभार क्रीडा शिक्षक संदीप आहेर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments