दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता जातेगाव ग्रामपालिकेच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच पंढरीनाथ वर्पे हे होते. ध्वजारोहण करणेबाबत सुचना सदस्य संदीप पवार यांनी मांडली तर ग्रामपालिकेच्या वतीने लिपिक सोपान खिरडकर यांनी अनुमोदन दिले.
नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट आणि वेळेत पंतप्रधान आवास योजनेसह इतर सर्व घरकुल योजनेचे काम पूर्ण केल्यामुळे ग्रामपालिकेस सन्मानीत करण्यात येणार असल्याने सन्मान पत्र स्विकारण्यासाठी गट विकास अधिकारी संतोष दळवी यांच्या सुचनेनुसार सौ. शांता पवार व ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी हे जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमासाठी गेले असल्याने, ध्वजाचे पूजन करून श्रीफळ उपसरपंच पंढरीनाथ वर्पे यांनी वाढविले.
तर सदस्य रामदास पाटील, संदीप पवार, सुरेष जाधव, महिला सदस्य सौ. कांताबाई खिरडकर, सौ. कल्पना गायकवाड, सौ. शाबेराबानो शेख,सौ.धनश्री पवार, सौ अनिता निंबारे, सौ. वैशाली चव्हाण, सौ.मनिषा पगारे सौ.ज्योती पगारे, आणि सौ. पुजा जाधव तलाठी किशोर अहिरे यांच्यासह सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ माजी सैनिक, ग्रामपालीकेचे लिपिक सोपान खिरडकर, अंकुश त्रिभुवन, धनराज पवार, रज्जाक शेख, लाला शेख इस्माईल शेख, शरद गायकवाड, मिथुन चव्हाण, राऊसाहेब जाधव, संतोष पवार व सर्व कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक येथील जिल्हा परिषदेच्या जिवन शिक्षण प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक अनिल बंड यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ग्रामपालिका सदस्य संदीप पवार यांनी मानले.
0 Comments