Bay- team aavaj marathi
नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामपालिकेस उत्कृष्ट ग्रामपालिका म्हणून मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते येथील सरपंच सौ शांताताई पवार व ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांना स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेकडून तालुक्यातून क्रमांक एकचा पुरस्कार आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात तालुक्यातील भालुर ग्रामपंचायत क्रमांक दोन, आणि साकोरा व गोंडेगाव ग्रामपंचायतीस क्रमांक तीनचा पुरस्कार देण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जातेगाव ग्रामपालिकेने पंतप्रधान आवास योजनेचा इतर घरकुल योजना वेळेत पूर्ण करून, जिल्हा परिषदेने दिलेले घरकुलाचे टार्गेट पूर्ण केल्याने दि.15 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महा आवास योजना सन 2023- 24 मध्ये नांदगाव तालुक्यातून सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार वितरण सोहळ्याचे पंचायत समिती कार्यालय नाशिक येथे आयोजन केले होते.
ग्रामपंचायत गोंडेगावचा पुरस्कार स्वीकारताना सरपंच सविता ताई जाधव उपसरपंच कचरु सरोवर व ग्रामसेवक
त्या अनुषंगाने प्रतिभा संगमनेरे प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या पत्रानुसार गटविकास अधिकारी संतोष दळवी यांच्या सूचनेनुसार येथील सरपंच सौ. शांताताई चांगदेव पवार व ग्रामविकास अधिकारी गोपाल चौधरी यांनी ग्रामपालिकेच्या वतीने पुरस्कार व स्मृतिचिन्ह स्विकारले. यावेळी तालुक्यातील भालुर ग्रामपंचायतीस क्रमांक दोनचे व गोंडेगाव आणि साकोरा ग्रामपालिकेस क्रमांक तीनचा पुरस्कार व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी तालुक्यातून ग्रामीण गृहनिर्माण अभियंता विजय चव्हाण आणि समीर पठाण यांना देखील सन्मानित करण्यात आले.
जि.प.नाशिकचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन मुंढे व पदाधिकारी
जातेगाव सरपंच सौ शांताताई पवार यांची प्रतिक्रिया


जि.प.नाशिकचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.अर्जुन मुंढे व पदाधिकारी
जातेगाव सरपंच सौ शांताताई पवार यांची प्रतिक्रिया
👇👇👇👇
0 Comments