कमाका जेटीके विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 Bay -team aavaj marathi

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुल व सौ.क.मा.कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. 

याप्रसंगी शालेय क्रीडा शिक्षक अशोक बागूल व संजय त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रिमंडळ, हाऊस कॅप्टन व टीमने संचलन केले. या कार्यक्रमात मागील शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलच्या1)अनुष्का पगार2)रोनक गंगवाल व यश निकम 3)हिमांशू चौरे या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.तर सौ.क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील 1)विधी साळुंखे 2)मेघा जगधने 3)कार्तिकी डफाळ या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.

तसेच मागील वर्षातील इयत्ता नववीच्या वर्गात प्रथम आलेल्या जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलचे विद्यार्थी 1)रसिका मेडतिया 2)श्रावणी गायकवाड 3) गुण कवडे तर सौ.क.मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयातील पूनम वाबळे या विद्यार्थ्यांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलचे प्रिन्सिपल मनी चावला यांना 'बेस्ट प्रिन्सिपल' अवॉर्ड तसेच 'राष्ट्रीय प्रतिभा सन्मान' तर्फे बेस्ट करीकुलम विथ अपॉर्डेबल फीस यासाठी रोख रक्कम एकविस हजार व एक एज्युकेशनल ट्रिप मिळाल्या -बद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. इंडियन टॅलेंट ओलम्पियाड तर्फे जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलला 'बेस्ट स्कूल 'अवॉर्ड देण्यात आला. त्याबद्दल प्रिन्सिपल व सर्व सहकारी शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.  त्याचप्रमाणे हिंदी विषय शिक्षिका प्रियंका राजुपूत व क्रीडा शिक्षक संजय ञिभूवन यांना आपल्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल यावेळी सन्मानित करण्यात आले. 

यावेळी आदिश्री अनासाने ,गार्गी दाभाडे,तनिष्का देशमुख ,आदिश्री गायकवाड, या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात देशभक्तीपर गीत, नृत्य, सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कुलची अनया चोपडा हिने सुंदर देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच अमायरा कासलीवाल हिने मनमोहक नृत्य सादर केले


याप्रसंगी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल, उपाध्यक्ष सुशीलकुमार कासलीवाल, सचिव -विजय चोपडा, विश्वस्त रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, आनंद कासलीवाल तसेच अंकुर कासलीवाल, अभिजीत कासलीवाल, प्रतिक कासलीवाल श्रीमती शोभाकाकीजी कासलीवाल, निर्मलाताई कासलीवाल , प्रमिलाताई कासलीवाल, ,मयुरीताई कासलीवाल, प्रिन्सिपल मनी चावला मुख्याध्यापक सर्वश्री शरद पवार, विशाल सावंत गोरख डफाळ, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल आहेर व वर्षा आहेर यांनी तर सिद्धार्थ जगताप यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments