Bay- team aavaj marathi
मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)
नांदगांव तालुक्यात खरीप पिकांच्या कणसात दाणे भरु लागली सप्टेबर मध्ये पिक आनेवारी जाहीर होईल पण नांदगांव शहरासह ग्रांमपंचायतीना पाणी पुरवठा करणार्या जिवन प्राधिकारण योजने कडुन पिण्यासाठी पुरेसे पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांवर विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे 
वरुण राजा तर रुसलाच पण धरणात पुरेसे पाणी असताना प्रशान देखील सुस्त झाले आहे? १५ आॅगस्टचा स्वातंञ्य दिन उगवला पण नागरिकाची तहान माञ प्रशासन भागवु शकले नाही जनता पाण्यासाठी टाहो फोडते आहे .नांदगांव शहर आणी ग्रामीण भागातील ५६ खेडी योजनेच्या गावांना गिरणा धरणात ५०% पाणी असताना देखील २० ते २५ दिवसाने पाणी पुरवठा होतो. याकडे शासन आणी प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. पावसाळ्यात देखील पाणी टंचाईने जनता ञस्त. झाले आहे. "धरण उशाला आणि कोरड घशाला" अशी परिस्थिती नागरिकांची झाली आहे. श्रावण महिण्यात आनेक धर्मीक सन होऊ घातले पण नांदगांव शहरात कधी १५,१७, २०,दिवसाने पाणी पुरवठा होतो तर कधी कधि ३० ते ४० दिवस लागत होत असे ? असेअसताना पावसाळ्याचे आडिच महिने झाले पण पाणी टंचाई काही दुर होईना.
उन्हाळ्यात नागरीकाना पाणी विकत घ्यावे लागत होते ति स्थिती पावसाळ्यात पाण आहे हि झाली नांदगांव शहराची स्थिती तर नांदगांव तालुक्यतील ५६ खेडी योजनेतील १७ गावांना देखील एक महिना तर कधि २० दिवसाने जेमतेम पाणी येते या वर्षात ग्रामीण भागात तर उन्हाळ्यात काय पावसाळ्यात देखिल पाणी टंचाईचि कळ सोसावी लागत आहे असे असताना पाणी प्रश्नावर शासन प्रशासन तर ढिंम दिसते. तर नागरीक शहरी असो की ग्रामीण हे देखील विकत पाणी घेतील पण शासन किंवा प्रशासनाल जाब विचारणार नाही निद्रिस्त प्रशासन व आळशी नागरीक सध्या तर पाण्या संदर्भात चकार शब्द उच्चारत नाही. याचा फायदा पाणी पुरवठा करणारी एमजीपी योजना घेत आहे त्यांचे रडगाणे काय असते पाईप लाईन लिकीज झाली बस एवढे म्हटले की झाले. वास्तविक नागरीकाना सुविधा पुरविने त्या मोबदल्यात कर वसुली करणे कर वसुली होतो. पण सुविधांच्या नावे ठणठण गोपाला .गिरणा धरणात वाढता पाणी साठी असताना नांदगांव व ग्रामीण भागातीला नागरीकाना पाण्यासाठी दुसरीकडे भिक मागावी लागत आहे या संदर्भात पालिका किंवा ग्रामपंचायत हाताची घडी व तोंडावर बोट या भुमीकेत दिसते? शिवाय कुठलीही संघटना किंवा सामाजक कार्यकतॆ देखील यावर आवाज उठवत नाही पाणी पुरवठ्या बाबात् पालिका व ग्रामपंचायत आदी प्रशासन सपसेल पणे फेल गेले आहे ५६ खेडी योजने खालील नागरीकाना पाणी पुरवठा करण्यास यंञना कुचकामी ठरली आहे.
.नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या संदर्भात प्रशासनाची जबाबदारी महत्त्वपूर्ण असते.
1.स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा प्रशासनाची मुख्य जबाबदारी म्हणजे नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि सतत पाणी पुरवठा करणे.स्वच्छा पाणी तर सोडा पण साधे पाणी देखील पुरेसे मिळत नाही.
2. पाणी व्यवस्थापन: पाणी साठवण, वितरण आणि पुनर्वापर यांची योग्य व्यवस्था करणं, तसेच पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करणे.
3. पायाभूत सुविधा:जलशुद्धीकरण केंद्रे, जलाशय, पाणी वाहतुकीसाठी पाइपलाइन आणि अन्य पायाभूत सुविधांची देखरेख व विकास.
4. कायद्यांची अंमलबजावणी:पाण्याच्या गैरवापराला आळा घालणे, जलसंपत्तीचे योग्य नियोजन आणि पाण्याचे प्रदूषण रोखणे.
5. पाणी समस्यांचे निराकरण:पाण्याशी संबंधित समस्या, जसे की पुरवठ्याची अडचण, गळती, किंवा अशुद्ध पाणी, यावर त्वरित उपाययोजना करणे.
6. प्रबोधन आणि प्रशिक्षण: नागरिकांना पाण्याचा योग्य वापर, बचत, आणि व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करणे.
हे सर्व करताना प्रशासनाला संबंधित कायद्यांचा आणि धोरणांचा आधार घ्यावा लागतो.या बाबात शासन प्रशान स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रांमपंचायती आदींनी जनतेच्या पाणी पुरवठ्यावर अंमल बजावणी करताना ठोस भुमीका घेतलेली नाही? श्रीराम नगर,गिरणा नगर,मल्हारवाडी, गंगाधरी,हिसवळ, जळगांव,आदीसह ५६ खेडी योजेखालील गावांना पुरसे पाणी मिळत नाही.
0 Comments