दुसऱ्या सोमवारी सुमारे 80 हजार भाविकांनी घेतले पिनाकेश्वराचे दर्शन आलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय

 Bay- team aavaj marathi 

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदैवत डोंगरावरील श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर येथे पवित्र श्रावण महिन्यातील दुसर्या सोमवारी भल्या पहाटे बारा वाजेच्या नंतर भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी रिघ लागली होती.दर्शनबारीतून महिला व पुरुषांची देवाच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याने, सर्व भाविकांचे व्यवस्थीत दर्शन झाल्याने आलेल्या भाविकांनी समाधान व्यक्त केले.

बहुतांश भाविकांनी येथे अभिषेक, सत्यनारायण पूजा करून दाळबट्टीचा नैवेद्य देवास दाखवून अन्नदान केले .आलेल्या भाविकांमध्ये महिला भाविकांची संख्या लाक्षणिक होती. हे देवस्थान जातेगाव पासून उत्तरेस सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्याच्या वन विभागाच्या हद्दीवर असलेल्या जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे जातेगांव चंदनपुरी येथील सर्वात मोठे श्री पिनाकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी दि.१२ रोजी पवित्र श्रावणी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७० हजार भाविकांनी हर हर महादेव, सद्गुगुरू जनार्दन स्वामी महाराज की जय, गंगागिरीजी महाराज की जय, बंब बंब भोले च्या गजरात दर्शन घेतले, काही भाविकांनी सत्यनारायण,अभिषेक इत्यादी धार्मिक विधी करून देवास डाळबट्टीचा नैवेद्य अर्पण केला. आलेल्या भाविकांमध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. देवस्थानच्या वतीने खाजगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली होती.



रविवारी रात्री १२ वाजता श्री पिनाकेश्वरास विस्वस्थ मंडळाच्या वतीने महाभिषेक करण्यात आला, त्यानंतर भविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री १२ बारावाजेपासून ते सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत मिळेल त्या वाहनाने येवून ७० हजार पेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतले. व त्यानंतर देखील रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांचा ओघ सुरुच होता. एकंदरीत ८० हजार भाविकांनी दर्शनासाठी आले असल्याचा दावा देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, सदस्य नाना पवार, दशरथ पवार, अंकुश वर्पे, पोपट जुंधरे, लक्ष्मण जुंधरे आदी उपस्थित होते. 

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोमवारी सकाळी ११ वाजता डोंगराच्या पायथ्यापासून मंदिराकडे जाणारा मार्ग दुचाकी सह सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. या रस्त्यावर सुमारे अडीच किलोमीटर दुतर्फा खाद्यपदार्थ प्रसाद खेळणी बेन्टेक्स ज्वेलरी फोटो इत्यादी दुकाने लागलेली होती. पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शना-खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे पोलिस हवालदार भास्कर बस्ते, व इतर महिला व पुरुष पोलिस कर्मचारी दंगा रोधक पथक आणि पोलिस होमगार्ड पथकातील कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.




Post a Comment

0 Comments