नांदगाव येथे आ.कांदे यांचा नाभिक समाजाचा कृतज्ञ स्नेह मेळावा

 Bay -team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव, नाशिक 

 तुम्ही दिलेल्या मतांच्या दानामुळे मी आमदार झालोय. म्हणून संत सेना महाराज यांचे सुबक मंदिर बांधण्यासाठी ४५ लाख रुपये देऊ शकलो. आता येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आशीर्वाद द्या.! नाभिक समाजासाठी मंगल कार्यालय, स्वातंत्र्यवीर डॉ. धुतेकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत जिवा महाले, शिवा काशीद यांचे देखणे स्मारक बांधून देईन. असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले.

आमदार निवास असलेल्या देवाज बंगल्यावर नांदगाव मतदार संघातील नाभिक समाजाचा कृतज्ञ स्नेह मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर संजय वाघ, ज्ञानेश्वर चातुर, बालाजी गवळी, विजय निकम, राजेंद्र बिडवे, विजय निकम, विजय गायकवाड, शरद बिडवे, नरेंद्र निकम, नितीन आहेर,दिनेश औटे, सुरेश देसाई, विद्या जगताप, बाळकृष्ण निकम, राजाराम निकम, महेंद्र निकम उपस्थित होते.

आ.श्री. कांदे पुढे म्हणाले की, कोरोना काळात ही समाज बांधवांच्या सुरक्षेचा विचार करून त्यांना मोफत पीपीई किट देण्यात आले होते. आणि भविष्यात जे मंगल कार्यालय बांधून देईन. तेथे गरीब असो वा श्रीमंत त्यांची अवघ्या ११ रुपयात लग्न लावून देण्यात येतील. तसेच मी शब्द देताना जो माझ्याकडून पूर्ण होईल, तोच शब्द देतो. अन्यथा देत नाही. म्हणून आजपर्यंत मी दिलेले सर्व शब्द आजपर्यंत पूर्ण झाले आहेत.तसेच माझी पत्नी सौ. अंजुम हिला नाभिक समाजाचे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांनी मुलगी मानले होते. त्यामुळे आमचे कायम त्यांच्या घरी येणे जाणे होते. अशी आठवण ही त्यांनी यावेळी सांगितली.

यावेळी नाभिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे, समाजसेविका सौ.अंजुम कांदे,गणेश निकम, कैलास तुपे, गणेश बोरसे, विनोद महाले, किरण बोरसे, हभप इंद्रायणी मोरे,रवी बिडवे,हभप रामकृष्ण महाराज, दिपक झुंजरराव, यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास युवा सेनेचे फरहान खान,ज्ञानेश्वर कांदे, किरण कांदे, धनंजय कांदे, सागर हिरे, सुनील जाधव, रोहिणी मोरे, प्रकाश शिंदे, अण्णा मुंडे, आबा नाईक, लाला नांगरे, शशी सोनावणे, भावराव बागुल, राजेंद्र देशमुख, डॉ. प्रभाकर पवार, मिहीर कातकडे, राजेश शिंदे, बापू जाधव, मुज्जू शेख, नितीन सोनावणे, आदी सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते. उपस्थित समाज बांधवाना संत सेना महाराज,जिवा महाले, शिवा काशीद यांची प्रतिमा, पैठणी व कपडे भेट देण्यात आले. सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले.


Post a Comment

0 Comments