जागतिक आदिवासी दिनी आदिवासी आद्य क्रांतिकारकांना श्रद्धांजली नांदगाव तालुक्यातील डोंगराच्या कुशीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसुमतेल येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आदिवासी दिनाच्या निमित्ताने बिरसा मुंडा ,टंट्या मामा भिल्ल ,राघोजी भांगरे, विर एकलव्य, राया ठाकर या थोर व्यक्तींना पुष्पहार व सुमने अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संजय जगताप, उपाध्यक्ष श्री संजय गावंडे व प्रमुख पाहुणे श्री संदीप पाटील, श्री अशोक पाटील, श्री भागिनाथ भुतांबरे, श्री भागिनाथ मोरे, श्री काळु भतांबरे, श्री कैलास कोळपे, सौ मंदाकिनी गावंडे यांची निवड करण्यात आली. सर्वांनी आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पित केले गावातील आदिवासी बांधवांच्या वतीने आद्य प्रेरक राया ठाकर यांच्या प्रतिमा सौ मंदाकिनी गावंडे व श्री रामदास गावंडे यांच्या वतीने शाळेत भेट देण्यात आल्या शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीवर आधारित गीतांवर बहारदार व आकर्षक नृत्यविष्कार सादर केले.
कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ व आदिवासी बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व आदिवासी बांधवांनी शालेय विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्नेहभोजन देऊन एक नवीन उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व आदिवासी बांधव, भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री सुनील अहिरे उपशिक्षक श्री मनोज गायकवाड व श्री संदेश कुमार मेश्राम या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
0 Comments