स्व. शरद अण्णा आहेर विद्यालय मांडवड मुलींचा कबड्डी संघ उपविजयी

 Bay- team aavaj marathi 

सिताराम पिंगळे सर पत्रकार नांदगाव नाशिक 

स्व.माणिकशेठ कासलीवाल यांच्या 24 व्या स्मृती पित्यर्थ आयोजित नांदगाव तालुकास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या एशियन गेम्स रोईंग पटू, छत्रपती पुरस्कार प्राप्त,अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भाऊ भोकनळ यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

 या स्पर्धेमध्ये मुलांच्या तीस संघाने तर मुलींच्या 14 संघाने सहभाग नोंदविला. साखळी सामन्यात उत्कृष्ट खेळ करीत मांडवडच्या मुलींच्या संघाने जामदरी संघावर दणदणीत विजय मिळून क्वार्टर फायनल मध्ये पानेवाडी संघावर एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनल मध्ये वडाळी संघावर चंचल नाजरकर व वैजयंती गांगुर्डे यांच्या दमदार कामगिरीमुळे उपांत्य फेरी जिंकत अंतिम स्पर्धेत प्रवेश मिळविला होता.

अंतिम स्पर्धेत नांदगाव कॉलेज विरुद्ध जनता विद्यालय मांडवड झालेल्या सामन्यांमध्ये स्व. शरद आण्णा आहेर जनता विद्यालय मांडवड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले वैजयंती गांगुर्डे,चंचल नाझरकर, वैष्णवी आहेर, निकिता मोकाशे,ऋतुजा आहेर, प्रिया वाडेकर, तेजस्वी कदम, प्रतीक्षा आहेर राणी गुजर, श्वेता गांगुर्डे,शितल जाधव या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्यांना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संदीप आहेर, विशाल आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे स्पर्धा यशस्वी ते बद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत भाऊ आहेर विठ्ठल आबा आहेर,अशोक भाऊ निकम, विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस कांबळे सर्व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या सह ग्रामस्थांनी विजयी संघाचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments