दि.९ ऑगस्ट :-वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात वीर एकलव्य यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी वीर एकलव्य जयंती व जागतिक आदिवासी दिनाच्या आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मोहन शेलार, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, गोटू मांजरे, संतोष राऊळ, नितीन आहेर, विशाल परदेशी, सौरभ जगताप, आदित्य कानडे, पार्थ कासार, प्रकाश बागल, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments