कांद्यावरील असलेली निर्यात बंदी उठवावी व नाफेड करून कांदा खरेदी करण्यात यावा त्याच -बरोबर कांद्याला ३५००₹ भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मालाला कमीत कमी सपोर्ट प्राईस MSP मिळावी म्हणून केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. त्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे संसदेच्या गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यात तथा संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
अहिल्यानगर अहमदनगरचे खासदार निलेश लंके, म्हाड्याचे खासदार धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील , दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरुजी, शिवसेना नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या महाराष्ट्रातील तसेच टीडीपी समाजवादी पार्टी व इंडिया आघाडीच्या इतर खासदारांनी ही आंदोलनामध्ये सहभाग घेत जोरदार पाठिंबा दिला.
महाराष्ट्रात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याचीबाजारपेठ लासलगांव येथे आहे तेथूनच कांदा उत्पादक सुञे हालवितात, कांदा उत्पादन अधिक होत आसल्याने शेतकर्यांची कांद्याला भाव मिळावा अशी मागणी होती त्या अनुषंगाने हे आंदोलन केले गेले या आंदोलाने राज्यातील शेतकर्यानी समाधान व्यक्त केले.
0 Comments