दहा वर्षांची परंपरा राखत घरासमोर केले पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

Bay team aavaj marathi 

मारुती जगधने जेष्ठ पत्रकार नांदगाव (नाशिक)

दहा वर्षाची परंपरा राखत नांदगाव येथील शिक्षक विजय चव्हाण हे शाडूमाती पासून गणपती तयार करणे कार्य- शाळेतून विद्यार्थाना मार्गदर्शन करत असता.त्याच प्रमाणे तयार केलेली मूर्तीची स्थापना करून सजावट ही पर्यावरण पूरक करतात, व विसर्जन ही घरासमोर करतात.

गेल्या दहा वर्षापासून सातत्याने  नरेंद्र नगर मध्ये पर्यावरण पूरक विसर्जन हि संकल्पना राबवीत आहेत.गणेशोत्सव हा पर्यावरण पूरक व्हावा या साठी शासन तसेच पर्यावरणावर काम करण्याऱ्या संस्था सोशल मिडीयावर विविध प्रसार मध्यम यासाठी गणेश भक्तांना नेहमी आव्हान कारत असतात.

उत्सव साजरा करतांना पाणी प्रदूषण होणार नाही, पाणवठ्याचा समतोल राखला जाईल याची सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी सातत्याने दहा वर्षा पासून नांदगाव मध्ये विजय चव्हाण हे शाडूमाती पासून गणपती तयार करणे कार्यशाळेतून विद्यार्थाना मार्गदर्शन करत असतात. ते ही स्वतःच्या घरी स्वतः तयार केलेली मूर्तीची स्थापना करून सजावट ही पर्यावरण पूरक करतात व विसर्जन ही घरासमोर करतात, गेल्या दहा  वर्षापासून सातत्याने त्यांचे हे कार्य सुरु आहे.

गणेश भक्तांना निसर्गात गणपती विसर्जन करण्याचा आनंद मिळावा  यासाठी घरासमोर निसर्गातील  देखावा तयार करण्यात आले. व तेथे टपामध्ये  गणपती विसर्जन केले.प्रथम सर्व नागरिक एकाच वेळी देखाव्या समोर येऊन भक्तिभावाने सहपत्नी आरती करण्यात आली त्यानंतर मोठ्या भक्ती भावाने  गणपतीचे विसर्जन करण्यात आले होते. तसेच  निर्माल्य तेथील झाडांच्या बुडाला खड्डा करून त्यात टाकण्यात आले. 

यावेळी उपस्थित सर्व गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप केले.या विसर्जन प्रसंगी नरेंद्र नगरातील विजय चव्हाण, बापू सुरसे ,मगन राठोड सुनिल आढाव, विलास बच्छाव अमोल बच्छाव, महाले, निखील जगताप शिवाजी आहेर, बालगोपाळ, महिला व गणेश भक्त  उपस्थित होते.वरील प्रमाणे जगधने फाउंडेशनच्या भारती सदन येथील शाडू माती बनविलेल्या गणेशाचे देखील घरघुती भांड्यात विसर्जन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments