जे.टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूल नांदगाव येथे 17 सप्टेंबर रोजी चिमुकल्यांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी चिमुकल्यांनी गणेश सजावट, भजन, कीर्तन, आरती याचाही आनंद लुटला. शाळेच्या शिक्षकांनी मुलांसाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले होते.
या उत्सवादरम्यान स्कूलचे प्राचार्य मनी चावला यांच्या अध्यक्षते -खाली सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. सुवर्णा आव्हाड व शाळेतील शिक्षक यांनी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले. यामध्ये इयत्ता नर्सरी ते युकेजी च्या विद्यार्थ्यांसाठी 'देवी देवतांची फॅन्सी ड्रेस स्पर्धा' तसेच इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 'ट्रॅडिशनल फॅशन परेड', तर इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी 'सोलो डान्स स्पर्धा', इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'पूजा थाली सजावट' या वेगवेगळ्या स्पर्धां घेण्यात आल्या होत्या. या सर्व स्पर्धांमध्ये खास आकर्षण ठरले ते देवी देवतांच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील प्रति बालाजी म्हणून वेशभूषा साकारलेली युकेजी चा विद्यार्थी रणवीर परदेशी व कालिकामातेच्या वेशभूषेतील यूकेजी ची विद्यार्थिनींनी आर्वी खैरनार यांनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा यावेळी विद्यार्थ्यांनी साकारलेली होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. प्रत्येक विद्यार्थ्यास यावेळी प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थ्यांबरोबरच यावेळी प्री प्रायमरी च्या पालकांसाठीही कुकिंग बॅटल(कुकिंग विदाऊट फ्लेम्स)या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतही पालकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी,पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग घेतला. गणेश उत्सवाच्या ह्या कार्यक्रमाने शाळेतील वातावरण अगदी प्रसन्न झाले होते. सर्व विद्यार्थी व पालकांना संस्थेचे चेअरमन. सुनीलकुमार कासलीवाल, सेक्रेटरी विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशील कासलीवाल, रिखब कासलीवाल, जिगोलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदीवाल, तसेच प्राचार्य मनी चावला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments